व्हिडिओ : निवृत्ती घेतल्यानंतरही वीरूनं मारले छक्के - पंजे

क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर क्रिकेटर वीरेंद्र सेहवागनं पहिल्यांदाच 'झी न्यूज'शी मनमोकळी बातचीत केलीय.

Updated: Oct 30, 2015, 03:48 PM IST
व्हिडिओ : निवृत्ती घेतल्यानंतरही वीरूनं मारले छक्के - पंजे title=

मुंबई : क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर क्रिकेटर वीरेंद्र सेहवागनं पहिल्यांदाच 'झी न्यूज'शी मनमोकळी बातचीत केलीय.

टीममध्ये असताना जे बोलू शकला नसता... त्या गोष्टीही वीरू इथं बोलणार का? या प्रश्नावर वीरु म्हणतो.... 'जेव्हा मी बोलतो... तेव्हा खरंच बोलतो... मग ते चांगलं असो किंवा वाईट... पण, वस्तुस्थितीच्या आधारावर'

अधिक वाचा - 2007 मध्येच निवृत्तीचा विचार होता, पण सचिननं रोखलं - वीरेंद्र सेहवाग

'मलाही करिअरच्या टॉपवर असतानाच निवृत्ती घ्यायला आवडली असती... चांगलं खेळत असतानाच निवृत्ती जाहीर करावी ही प्रत्येक क्रिकेटरचीच इच्छा असते... मलाही निवृत्तीच्या वेळी भाषण देता आलं असतं... पण, नशिबात काही वेगळंच होतं' असं सेहवागनं झी न्यूजशी बोलताना म्हटलंय.

 

 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.