महिला क्रिकेटपटूच्या बॉलवर बोल्ड झाला अकमल, सगळीकडे थट्टा

आतंरराष्ट्रीय पातळीवर आपल्या खराब विकेट किपिंगमुळे कोट्यवधी लोकांचा थट्टेचा विषय बनलेला पाकिस्तानचा क्रिकेटपटू उमर अकमलनं पुन्हा एकदा सर्व पाकिस्तानी जनतेला नाराज केलंय. अकमल नॉर्वेमध्ये सुरू असलेल्या एका मॅचमध्ये महिला लेग स्पिनरच्या बॉलवर बोल्ड झाला. यानंतर सोशल मीडियावर पुन्हा लोकांनी त्याची खिल्ली उडवली.

Updated: Aug 26, 2015, 09:31 PM IST
महिला क्रिकेटपटूच्या बॉलवर बोल्ड झाला अकमल, सगळीकडे थट्टा title=

नवी दिल्ली: आतंरराष्ट्रीय पातळीवर आपल्या खराब विकेट किपिंगमुळे कोट्यवधी लोकांचा थट्टेचा विषय बनलेला पाकिस्तानचा क्रिकेटपटू उमर अकमलनं पुन्हा एकदा सर्व पाकिस्तानी जनतेला नाराज केलंय. अकमल नॉर्वेमध्ये सुरू असलेल्या एका मॅचमध्ये महिला लेग स्पिनरच्या बॉलवर बोल्ड झाला. यानंतर सोशल मीडियावर पुन्हा लोकांनी त्याची खिल्ली उडवली.

आणखी वाचा - VIDEO : जाता जाता संघकाराला आपले अश्रू आवरणंही झालं कठिण!

महिलांसाठी आयोजित एका मॅचमध्ये उमर अकमल स्पेशल गेस्टच्या रुपात आला होता. तरुण बॉलर इस्मा अहमदच्या ऑफ स्टंपहून बाहेर जाणाऱ्या बॉलवर अकमल लेग साइडवर हलक्या हातानं ग्लांस करू इच्छित होता. मात्र बॉल बॅटवर लागून विकेटमध्ये लागली. अशा पद्धतीनं आऊट झाल्यानंतर अकमल हसत-हसत मैदानाबाहेर गेला. तर इस्मा आनंदानं नाचायला लागली.

ही माहिती कुणाला कळली नसती, पण जसा व्हिडिओ इंटरनेटवर वायरल झाला अकमल पुन्हा चर्चेत आला. 

आणखी वाचा - डेल स्टेनने विकेट काढताना स्टम्पचा तुकडाच पाडला

मॅचपूर्वी अकमलने एक फोटो पण पोस्ट केला होता, ज्यात भारतीय बॉलर मोहित शर्मा पण दिसतोय. 

पाहा हा व्हिडिओ- 

Umar Akmal Clean Bowled A Girl In ( Norway... by HDCricketVideo

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.