मुंबई इंडियन्समध्ये हे २ भाऊ झळकणार

आयपीएल सीझन ९ मध्ये पहिला सामना पुणे आणि मुंबईय यांच्यात रंगणार आहे. पुण्याचा कर्णधार धोनीचा सामना मागच्या सीजनची विजेता टीम रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स बरोबर होणार आहे.

Updated: Apr 9, 2016, 08:02 PM IST
मुंबई इंडियन्समध्ये हे २ भाऊ झळकणार title=

मुंबई : आयपीएल सीझन ९ मध्ये पहिला सामना पुणे आणि मुंबईय यांच्यात रंगणार आहे. पुण्याचा कर्णधार धोनीचा सामना मागच्या सीजनची विजेता टीम रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स बरोबर होणार आहे.

आयपीएल ९ मध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळते. मुंबई इंडियन्समध्ये संधी मिळालेल्या हार्दिक पांड्याला भारतीय संघात ही मोठी कामगिरी करण्यासाठी संधी मिळाली. हार्दिक पांड्याचा मोठा भाऊ कृणाल पांड्याला देखील मुंबई इंडियन्समध्ये संधी मिळाली आहे.

हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या हे दोन भाऊ मुंबई इंडियन्समधून एकत्र खेळणार आहे. या आधी इरफान आणि युसूफ पठान यांची जोडी आयपीएलमध्ये चमकली होती.