ती जर्सी चहालला ठरली लकी

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20मध्ये भारताचा 75 रननी विजय झाला आहे.

Updated: Feb 2, 2017, 11:55 AM IST
ती जर्सी चहालला ठरली लकी  title=

बंगळुरू : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20मध्ये भारताचा 75 रननी विजय झाला आहे. भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो युझुवेंद्र चहाल. चहालनं 4 ओव्हरमध्ये 25 रन देऊन इंग्लंडच्या 6 बॅट्समनना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. आंतरराष्ट्रीय टी20 मॅचमध्ये 6 विकेट घेणारा चहाल हा पहिला भारतीय ठरला आहे. या मॅचमध्ये चहाल 6 नंबरची जर्सी घालून मैदानात उतरला होता, त्यामुळे 6 नंबर हा चहालसाठी लकीच म्हणावा लागेल.