मुंबई : IPL-9 व्या सीजनमध्ये चांगली कामगिरी करणारा कर्णधार बाहेर पडणार आहे. त्याने चक्क ब्रेक घेण्याचे ठरवलेय. कारणही तसेच आहे. त्याला नेदरलॅंडला जायचेय.
गुजरात संघाचा कर्णधार सुरेश रैना याने नेदरलँडला वास्तव्य करत असणाऱ्या आपल्या पत्नीला भेटण्यासाठी हा निर्णय घेतलाय. सुरेश रैनाची पत्नी प्रेग्नंट आहे. तिची काळजी घेण्यासाठीच त्याने स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय.
आयपीएल स्पर्धेत सध्या गुजरात चांगली कामगिरी करीत आहे. प्रथमच गुजरातचा संघ आयपीएलमध्ये खेळत आहे. मात्र, रैनाच्या या निर्णयामुळे गुजरात टीमला मोठा धक्का बसणार आहे.
रैनाला त्याच्या कर्णधार खेळीबद्दल विचारले असता तो म्हणाला, लग्नानंतर माझ्यात खूप बदल झाले आहेत. आता मी शांत राहून माझ्या जबादारी व्यवस्थित पार पडतो. आयपीएलमध्ये सुद्धा आता हाच फॉर्म्युला मी वापरत आहे. माझ्या पत्नीचा माझ्या यशात मोठा वाटा आहे.
प्रियांका मला नेहमी संघ सहकाऱ्यांसोबत राहण्यास प्रोत्साहन देते. तिला हे माहीत आहे की, या गोष्टीने संघाचा खेळ उंचावणार आहे. असे म्हणत रैना आपल्या पत्नीचे कौतुक करतो. आज तिला माझी गरज आहे. प्रियांका सध्या गर्भवती आहे. म्हणून मी हा निर्णय घेतलाय, असे त्याने स्पष्टीकरण दिलेय.