माझ्यासाठी देवासारखा आहे सचिन तेंडुलकर - धोनी

सचिन तेंडुलकरला आपला आदर्श असल्याचं टीम इंडिया वनडेचा कॅप्टन धोनीनं म्हटलंय. सचिन तेंडुलकर एक महान खेळाडू आहे, त्याची नम्रता आणि खेळाबद्दल असलेली आवड इतरांसाठी प्रेरणा देणारी आहे. 

Updated: Sep 2, 2015, 10:57 AM IST
माझ्यासाठी देवासारखा आहे सचिन तेंडुलकर - धोनी title=

न्यूयॉर्क: सचिन तेंडुलकरला आपला आदर्श असल्याचं टीम इंडिया वनडेचा कॅप्टन धोनीनं म्हटलंय. सचिन तेंडुलकर एक महान खेळाडू आहे, त्याची नम्रता आणि खेळाबद्दल असलेली आवड इतरांसाठी प्रेरणा देणारी आहे. 

उत्तर अमेरिका बिहार झारखंड टीमद्वारे न्यूजर्सीमध्ये आपल्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमादरम्यान विकेटकिपर बॅट्समन धोनीनं भारतीय प्रवाशांसोबत बातचित केली. तो म्हणाला, 'जेव्हा मी मोठा होत होतो तेव्हा आम्ही सचिनला खेळतांना पाहायचो, तो आमच्या सर्वांसाठी देवासारखा आहे. त्याच्या जवळपास तशीच चमक असायची.'

आणखी वाचा - धोनी-जडेजा मैत्री टीम इंडियासाठी घातक?

सचिन चांगला आदर्श आहे कारण तो यशस्वी असून विनम्र पण आहे. धोनी पुढे म्हणाला, 'मी जेव्हा क्रिकेट खेळायला सुरूवात केली तेव्हा सचिन कसा प्रक्रियेत विश्वास ठेवतो हे पाहिलं.'

अमेरिकन बाजार या वेबपोर्टलमधील व्हिडिओमध्ये धोनी म्हणतो, 'तो जेव्हा मैदानात उतरायचा तेव्हा तो एक क्रिकेटपटू म्हणून सुधारणा करू इच्छित असे. मला वाटतं की तो आदर्श व्यक्ती आहे ज्याला बघून पुढे जावू शकतो. मी ही तेच केलं.'

आणखी वाचा - धोनी सुट्टी घेऊन चाललाय तरी कुठे?

धोनीला विचारलं की, आता तुला क्रिकेटच्या मैदानात कधी बघायला मिळेल तर त्यानं ऑक्टोबरमध्ये आपण खेळणार असल्याचं तो म्हणाला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.