मोहम्मद अझरुद्दीनने श्रीलंकेत केली होती अशी कामगिरी

श्रीलंकेत 22 वर्षानंतर टीम इंडियाने कसोटी क्रिकेट मालिका जिंकण्याचा पराक्रम केलाक. याआधी मोहम्मद अझरुद्दीनने अशी कामगिरी केलेय.

Updated: Sep 1, 2015, 07:28 PM IST

मुंबई : श्रीलंकेत 22 वर्षानंतर टीम इंडियाने कसोटी क्रिकेट मालिका जिंकण्याचा पराक्रम केलाक. याआधी मोहम्मद अझरुद्दीनने अशी कामगिरी केलेय.

1993 मध्ये मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारताला श्रीलंकेमध्ये कसोटी मालिका जिंकण्यात यश आलं होतं. आता विराट कोहलीच्या सेनेने ते करुन दाखवलं आहे.

अधिक वाचा : टीम इंडियाने तिसरी कसोटी जिंकत 22 वर्षानंतर मालिका जिंकली

टीम इंडियानं तब्बल 22 वर्षांनी श्रीलंकेला त्यांच्याच भूमित पराभूत करण्याची किमया साधली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं अखेरच्या कोलंबो टेस्टमध्ये श्रीलंकेवर 117 रन्सने मात केली. या विजयासह भारतानं तीन टेस्ट मॅचेसची सीरिज 2-1 नं जिकंली. त्याचप्रमाणे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालीही भारतीय टीमनं पहिल्यांदा टेस्ट सीरिजवर कब्जा केला. 

अधिक वाचा : ईशांत शर्माची सटकली, श्रीलंका खेळाडूंशी भिडला

भारतानं लेकसमोर 386 रन्सचं अशक्यप्राय लक्ष ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना लंकेची टीम दुस-या इनिंग 268 रन्सवरच ऑल आऊट झाली. ईशांत शर्मानं अखेरच्या टेस्टमध्ये सर्वाधिक 8 विकेट्स घेत भारताच्या विजयात निर्णायक भूमिका ठरली. तर चेतेश्वर पुजारनं पहिल्या इनिंगमध्ये केलेली सेंच्युरी इनिंग खेळली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.