आता सुनील नारायणच्या अॅक्शन वरून वाद

वेस्ट इंडिजचा स्टार स्पिनर सुनील नारायण याची बॉलिंग अॅक्शन संशयास्पद असल्याचं सांगितलं जातं. सोमवारी रात्री झालेल्या कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध डॉल्फिन्स चॅम्पियन्स लीग टी – २०च्या सामन्यात फिल्ड अंपायर अनिल चौधरी, सिनीअर शमसुद्दीन आणि थर्ड अंपायर कुमार धर्मसेनानी यांनी नारायणच्या अॅक्शनवर संशय व्यक्त केला आहे.

Updated: Sep 30, 2014, 07:15 PM IST
आता सुनील नारायणच्या अॅक्शन वरून वाद title=

हैदराबाद : वेस्ट इंडिजचा स्टार स्पिनर सुनील नारायण याची बॉलिंग अॅक्शन संशयास्पद असल्याचं सांगितलं जातं. सोमवारी रात्री झालेल्या कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध डॉल्फिन्स चॅम्पियन्स लीग टी – २०च्या सामन्यात फिल्ड अंपायर अनिल चौधरी, सिनीअर शमसुद्दीन आणि थर्ड अंपायर कुमार धर्मसेनानी यांनी नारायणच्या अॅक्शनवर संशय व्यक्त केला आहे.

पाकिस्तानचा स्पिनर सईद अजमल याला बॉलिंग अॅक्शनमुळे प्रतिबंधित केलंय. तर अजून एक पाकिस्तानचा मोहम्मद हफीजच्या गोलदांजीवर बॅन केलं आहे.

सुनील हा कोलकाता टीमचा प्रमुख गोलंदाज असून त्यानं आतापर्यंतच्या टूर्नामेंटमध्ये झालेल्या चार मॅचमध्ये ११ विकेट घेतल्या आहेत. जर नारायणच्या अॅक्शन विरोधात अजून एक रिपोर्ट आला. तर त्यांना चॅम्पियन्स लीग टी-२० मधील पुढील मॅचमध्ये बॉलिंग करू शकणार नाही.

कोणत्या प्रकारची बॉलिंग संशयास्पद -

सुनील नारायणचा ‘क्किकर बॉल’ संशयास्पद असल्याचं सांगितले जातं. अंपायर्सकडून केलेल्या कारवाई रिपोर्टनुसार बॉलिंग करताना नारायणचा कोपरा १५ डिग्रीपेक्षा अधिक वळतो. त्याने चॅम्पियन्स लीग टी-20 2014च्या 4 मॅचमध्ये 7.45 सरासरीने 11 विकेट काढल्या आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.