भारतासमोर आज बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान

सुल्तान अझलन शाह कप हॉकी स्पर्धेत आज भारताची लढत बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होतेय.

Updated: May 2, 2017, 01:00 PM IST
भारतासमोर आज बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान title=

इपोह, मलेशिया : सुल्तान अझलन शाह कप हॉकी स्पर्धेत आज भारताची लढत बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होतेय.

भारताने गेल्या सामन्यात न्यूझीलंडला ३-०ने हरवले. तर त्याआधी ग्रेट ब्रिटनविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला न्यूझीलंडविरुद्धच्या विजयाने भारतीय हॉकी संघाचा आत्मविश्वास दुणावला असली तरी या सामन्यात त्यांची खरी कसोटी लागणार आहे. 

दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडशी बरोबरी राखता आलीये. तर दुसऱ्या सामन्यात त्यांनी मलेशियाला तब्बल ६-१ अशा फरकाने हरवले. त्यामुळे दोन्हीकडे पारडे जड दिसतेय. 

सामन्याची वेळ : दुपारी १.३५ वाजता.