मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर टी-२० वर्ल़्डकपमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेलने पुन्हा एकदा सिद्ध केले की त्याला धडाकेबाज फलंदाज का म्हटले जाते ते.
गेलने या सामन्यात ४८ चेंडूत नाबाद शतक ठोकले. तसेच टी-२०मध्ये अनेक रेकॉर्डही केले. सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा मानही गेलला मिळाला.
मुंबईच्या वानखेडेवर धावांचा पाऊस बरसवल्यानंतर गेलने सांगितले तो मैदानात मोठी खेळी करण्याच्या इराद्यानेच उतरला होता. षटकारांचा पाऊस पाडण्यासाठी त्याचा सहकारी सुलेमान बेनने त्याला उकसवले होते, असे गेलने सामना संपल्यानंतर सांगितले.
जेव्हा मैदानात खेळी कऱण्यासाठी गेल उतरला तेव्हा सुलेमानने त्याला एंटरटेन करण्यास सांगितले होते. आणि गेलसाठी एंटरनेट म्हणजे केवळ सिक्सर, सिक्सर आणि सिक्सर हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिले.