२०५ वनडे मॅच खेळून धोनी आठव्या क्रमांकावर!

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीनं अजून एक रेकॉर्ड नावावर केला आहे. हा रेकॉर्ड त्यानं वेस्टइंडीज विरूद्ध सामन्यात टॉस करण्यासाठी मैदानात उतरल्याक्षणीच केला आहे. धोनी हा त्याच्या कारकीर्दीतली २५०वी वनडे मॅच खेळणारा भारतातील आठव्या क्रमांकाचा खेळाडू झाला असून या ठिकाणी पोहचणारा जगातील चौथा क्रमांकाचा विकेटकीपर झाला आहे.

Updated: Oct 17, 2014, 06:19 PM IST
२०५ वनडे मॅच खेळून धोनी आठव्या क्रमांकावर! title=

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीनं अजून एक रेकॉर्ड नावावर केला आहे. हा रेकॉर्ड त्यानं वेस्टइंडीज विरूद्ध सामन्यात टॉस करण्यासाठी मैदानात उतरल्याक्षणीच केला आहे. धोनी हा त्याच्या कारकीर्दीतली २५०वी वनडे मॅच खेळणारा भारतातील आठव्या क्रमांकाचा खेळाडू झाला असून या ठिकाणी पोहचणारा जगातील चौथा क्रमांकाचा विकेटकीपर झाला आहे.

 

वेस्टइंडीजच्या विरूद्ध ही चौथी वनडे मॅच आहे. या आधी त्यानं २४९ मॅचमध्ये ५३.१५ सरासरी ८,१८६ रन्स बनविले असून त्यात नऊ शतक आणि ५६ अर्ध शतकांचा समावेश आहे.  

 

सचिन तेंडुलकरने (४६३ मॅच) सर्वात जास्त वनडे खेळणारा खेळाडू होण्याचा मान मिळविला आहे. तसंच राहुल द्रविड (३४४), मोहम्मद अजहरूद्दीन (३३४), सौरव गांगुली (३११), युवराज सिंग (२९३), अनिल कुंबळे (२७१), वीरेंद्र सहवाग (२५१) आणि धोनी (२५०)  क्रमांकावर आहे.

 

विकेटकीपरमध्ये धोनी हा जगातील चौथा क्रमांकाचा विकेटकीपर झाला असून ज्या २५० वनडे मॅच त्याच्या नावावर आहे. श्रीलंकाचा कुमार संगकारा (३३६), दक्षिण अफ्रीकाचा मार्क बाउचर (२९४) आणि ऑस्ट्रेलियाचा एडम गिलक्रिस्ट (२८२)नंतर धोनीचा नंबर येतो.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.