17 वर्षांनंतर श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियाला लोळावलं

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये श्रीलंकेचा 106 रन्सनी दणदणीत विजय झाला आहे.

Updated: Jul 30, 2016, 06:14 PM IST
17 वर्षांनंतर श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियाला लोळावलं  title=

पालेकल : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये श्रीलंकेचा 106 रन्सनी दणदणीत विजय झाला आहे. तब्बल 17 वर्ष म्हणजेच 1999नंतर श्रीलंकेचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा पहिलाच विजय आहे. श्रीलंकेनं आत्तापर्यंत फक्त दोनवेळा ऑस्ट्रेलियाला टेस्टमध्ये हरवलं आहे. या सीरिजमध्ये श्रीलंकेनं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 

शेवटच्या इनिंगमध्ये 268 रनचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची टीम 161 रनवर ऑल आऊट झाली. या इनिंगमध्ये श्रीलंकेच्या बॉलर्सनी सलग 25 ओव्हर मेडन टाकण्याचा विश्वविक्रम केला. 

श्रीलंकेच्या या विजयाचा शिल्पकार ठरला कुशल मेंडिस. श्रीलंकेचा पहिला डाव 117 रनवर आटोपला होता. यानंतर श्रीलंकेच्या बॉलर्सनी ऑस्ट्रेलियाला 203 गुंडाळलं होतं. दुसऱ्या इनिंगमध्ये कुशल मेंडिसनं 176 रनची इनिंग खेळून ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 268 रनचं आव्हान ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाला मात्र फक्त 161 रनपर्यंतच मजल मारता आली.