मुंबई : भारताचे क्रीडा मंत्री विजय गोयल हे पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दीपा कर्माकरनं सगळ्यांचीच मन जिंकली. रविवारी झालेल्या मॅचआधी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.
क्रीडा मंत्री विजय गोयल यांनीही दीपाला शुभेच्छा दिल्या पण या शुभेच्छा देताना गोयल यांनी दीपाचं आडनावच चुकवलं. एवढच नाही तर गोयल यांनी दीपाला दिलेल्या शुभेच्छांच्या पोस्टरवर दीपाचा फोटो लावण्याऐवजी स्वत:चाच फोटो लावला. सोशल मीडियावर गोयल यांच्यावर टीकेची झोड उठली.