एबी डिव्हिलियर्स , मॉर्कल हमसून हमसून रडले

पराभव पचवणं किती कठीण असतं, हे आज वर्ल्ड कप २०१५ च्या सेमीफायनल सामन्यानंतर दिसून आलं, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान सामन्याचा निकाल लागल्यानंतर काही खेळाडू हमसून हमसून रडले.

Updated: Mar 24, 2015, 04:54 PM IST
एबी डिव्हिलियर्स , मॉर्कल हमसून हमसून रडले title=

ऑकलंड : पराभव पचवणं किती कठीण असतं, हे आज वर्ल्ड कप २०१५ च्या सेमीफायनल सामन्यानंतर दिसून आलं, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान सामन्याचा निकाल लागल्यानंतर काही खेळाडू हमसून हमसून रडले.

न्यूझीलंडचा बॅटसमन एलियटने सिक्स मारून सामना जिंकवला, किवी खिलाडींच्या चेहऱ्यावर विजयाचा उत्साह ओसांडून वाहत होता, ते एकमेकांची गळा भेट घेत होते, दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या तंबूत चेहरे पडले होते.

पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेचा ज्येष्ठ खेळाडू आणि कॅप्टन एबी डिव्हिलियर्स आणि वेगवान बॉलर मॉर्कल मैदानातच रडला. मोनी मार्केल स्वत:ला सांभाळू शकला नाही, म्हणून मैदानात तो जागच्या जागी बसला, त्याला इतर दक्षिण आफ्रिकेच इतर खेळाडू समजावत होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.