माजी कर्णधार सौरव गांगुलीला जीवे मारण्याची धमकी

टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचं वृत्त आहे. अज्ञात व्यक्तीनं चिट्ठी पाठवून गांगुलीला धमकी दिली आहे. स्वतः गांगुलीनं धमकी मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Updated: Jan 10, 2017, 11:53 AM IST
माजी कर्णधार सौरव गांगुलीला जीवे मारण्याची धमकी  title=

कोलकाता : टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचं वृत्त आहे. अज्ञात व्यक्तीनं चिट्ठी पाठवून गांगुलीला धमकी दिली आहे. स्वतः गांगुलीनं धमकी मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

५ जानेवारीला गांगुलीला ही चिट्ठी मिळाली. १९ जानेवारीला पश्चिम मेदिनीपुरच्या विद्यासागर विद्यापीठात होणा-या एका कार्यक्रमात सहभागी झाला तर परतणार नाही अशा आशयाची ती चिट्ठी आहे. ही चिट्ठी गांगुलीच्या घराबाहेर सापडली. कोलकाता पोलिसांना आणि कार्यक्रमाच्या आयोजकांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. गांगुली या कार्यक्रमात जाणार की नाही हे अजून समजू शकलेलं नाही.