चाहत्याचा फुकटचा सल्ला, राहुलचं कडक उत्तर

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये दोन्ही इनिंगमध्ये हाफ सेंच्युरी करणारा के.एल. राहुल भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

Updated: Mar 7, 2017, 08:37 PM IST
चाहत्याचा फुकटचा सल्ला, राहुलचं कडक उत्तर title=

बंगळुरू : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये दोन्ही इनिंगमध्ये हाफ सेंच्युरी करणारा के.एल. राहुल भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. राहुलला मॅन ऑफ द मॅच देऊनही गौरवण्यात आलं. या टेस्टमध्ये जबरदस्त बॅटिंग करणारा राहुल ट्विटरवरही सूसाट पाहायला मिळाला.

ट्विटरवर ट्रोल करणाऱ्याला राहुलनं कडक उत्तर दिलं आहे. भारताचा ऑफ स्पिनर अश्विननं राहुलला ट्विटरवर फॉलो केलं. अश्विननं फॉलो केल्यामुळे दिवसाची सुरुवात उत्तम झाली असं ट्विट राहुलनं केलं. या ट्विटला रिप्लाय देताना एका फॅननं हे सगळं सोडून दे, रन्स कशा करायचा त्यावर लक्ष दे असं ट्विट केलं. यावर प्रत्युत्तर देताना राहुल म्हणाला की, भावा तू येऊन आम्हाला शिकव. रन्स कशा बनवायचा हे तुला माहिती आहे.