धोनीच्या खराब प्रदर्शनवर बोलला स्मिथ

आयपीएल 10 मध्ये आतापर्यंत ५ पैकी २ सामन्यांमध्येच पुणे संघ विजय मिळवू शकला आहे. गुण यादीत त्यामुळे ते सर्वात शेवटच्या क्रमाकांवर आहेत.

Updated: Apr 22, 2017, 11:52 AM IST
धोनीच्या खराब प्रदर्शनवर बोलला स्मिथ title=

मुंबई : आयपीएल 10 मध्ये आतापर्यंत ५ पैकी २ सामन्यांमध्येच पुणे संघ विजय मिळवू शकला आहे. गुण यादीत त्यामुळे ते सर्वात शेवटच्या क्रमाकांवर आहेत.

संघाचा कर्णधार स्टीव स्मिथचं म्हणणं आहे की, योग्य कॉम्बिनेशन मिळणं कठीण आहे. खासकरुन आमच्या सारख्या नव्या संघाला. आम्हाला ताळमेळ बसवणं थोडं कठीण होत आहे. त्यामुळे गुजरात आणि आम्हाला नुकसान होत आहे. आम्ही दुसऱ्या सीजनमध्ये आहोत. तर इतर संघ अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये आहेत.

माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आतापर्यंत ५ सामन्यांमध्ये फक्त ६१ रन बनवू शकला आहे. आयपीएलचा हा सीजन त्याच्यासाठी कठीण जातांना दिसतोय. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू स्टीव स्मिथ मात्र यावर नाराज नाही आहे. तो म्हणतो की, 'धोनी आता जेथे आहे मी खूश आहे. तो नेटमध्ये चांगला खेळतो. फॉर्म हा अस्थायी असतो पण क्लास स्थायी असतो. महेंद्र सिंह धोनी हा सदाबहार क्लास प्लेयर आहे. आम्ही त्याला मागच्या सामन्यामध्ये सिक्स मारतांना पाहिलं आहे. तो लवकरच पुन्हा फॉर्ममध्ये येईल अशी अपेक्षा आहे.'