साई प्रणिथला सिंगापूर ओपन सुपर सीरिजचं जेतेपद

 भारताच्या साई प्रणिथने सिंगापूर ओपन सुपर सीरिजवर आपलं नाव कोरलं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 16, 2017, 03:28 PM IST
साई प्रणिथला सिंगापूर ओपन सुपर सीरिजचं जेतेपद title=

सिंगापूर : भारताच्या साई प्रणिथने सिंगापूर ओपन सुपर सीरिजवर आपलं नाव कोरलं. त्यानं फायनलमध्ये भारताच्याच के. श्रीकांतवर मात केली. साई प्रणिथनं फायनलमध्ये श्रीकांतवर 17-21, 21-17, 21-12 नं मात केली. त्याचं बॅडमिंटन करिअरमधील हे पहिलं-वहिलं सुपर सीरिज विजेतेपद ठरलं. 

पहिला गेम गमवावा लागल्यानंतर त्यानं दुस-या गेममध्ये जोरदार कमबॅक करत मॅचवर आपली पकड मजबूत केली. तिस-या गेममध्ये त्यानं अनुभवी श्रीकांतला मॅचमध्ये परतण्याची संधीच दिली नाही. आणि तिस-या गेमसह सिंगापूर ओपनचं विजेपेदही पटकावलं. दरम्यान, पहिल्यांदाच सुपर सीरिजच्या फायनलमध्ये दोन भारतीय बॅडमिंटनपटू आमने-सामने आले होते.