शोएबनं युवराज सिंहला दिलंय 'ओपन चॅलेंज'

पाकिस्तानी क्रिकेटर आणि टेनिस स्टार सानिया मिर्झा हिचा पती शोएब मलिक यानं भारतीय क्रिकेटर युवराज सिंहला 'ओपन चॅलेंज' दिलंय. सोशल वेबसाईटवरच शोएबनं हे आव्हान दिलंय... पण, हे आव्हान क्रिकेटबद्दल नाही तर डान्ससाठी आहे.

Updated: Jul 24, 2015, 08:26 PM IST
शोएबनं युवराज सिंहला दिलंय 'ओपन चॅलेंज' title=

नवी दिल्ली : पाकिस्तानी क्रिकेटर आणि टेनिस स्टार सानिया मिर्झा हिचा पती शोएब मलिक यानं भारतीय क्रिकेटर युवराज सिंहला 'ओपन चॅलेंज' दिलंय. सोशल वेबसाईटवरच शोएबनं हे आव्हान दिलंय... पण, हे आव्हान क्रिकेटबद्दल नाही तर डान्ससाठी आहे.

त्याचं झालं असं की, श्रीलंका आणि पाकिस्तानच्या लढतीत पाकनं विजय मिळवल्यानंतर सानिया आणि शोएब यांनी आपला एक डबस्मॅश व्हिडिओ सोशल वेबसाईटवर शेअर केला होता. 

या व्हिडिओवर युवराजनंही आपली प्रतिक्रिया नोंदवली... आणि दोघांनाही 'भयानक डान्सर्स' म्हटलं. 'सानिया आणि शोएब चांगलेच खेळाडू आहेत... पण भयानक डान्सर्स आहेत' अशी प्रतिक्रिया युवराजनं नोंदवली होती. 

यावर, शोएबनंही प्रत्युत्तर देत ट्विट केलंय 'आ जाओ मैदान मे'...  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.