शोएब अख्तरनं भारताला पुन्हा डिवचलं...

पाकिस्तानचा माजी तेजतर्रार बॉलर शोएब अख्तर यानं पुन्हा एकदा भारतीय बॉलर्सला डिवचलंय.

Updated: Oct 6, 2015, 07:44 PM IST
शोएब अख्तरनं भारताला पुन्हा डिवचलं...  title=

नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी तेजतर्रार बॉलर शोएब अख्तर यानं पुन्हा एकदा भारतीय बॉलर्सला डिवचलंय.

भारतीय टीममध्ये अभ्यासू खेळाडूंची कमतरता असल्याचं शोएबनं म्हटलंय. भारतीय क्रिकेट टीममध्ये विकेट मिळवणारा एकमात्र बॉलर आहे आणि तो म्हणजे ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन... असं शोएबचं म्हणणं आहे. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० सीरिजमध्ये भारताच्या झालेल्या पराभवानंतर तो बोलत होता. भारतीय बॉलर्सच्या आक्रमकतेत कोणताही अभ्यासूपणा नाही. अश्विननं आपले चार ओव्हर खेळल्या तर त्याच्यानंतर कोणताही असा बॉलर नाही जो विरोधकांच्या बॅटसमनची साखळी तोडू शकेल. प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत आणणारा एकही बॉलर भारतीय टीमकडे नाही, असंही त्यानं म्हटलंय. 

मोहम्मद शमी अनफिट असल्यानं आणि उमेश यादवची निवड न झाल्यानं भारतीय टीमकडे कोणताही प्रेरणास्त्रोत नाही. भारतीय टीमला आपल्या टी२० खेळण्यासाठी आपला अंदाज बदलावा लागेल. अंबाती रायुडू ऐवजी अजिंक्य राहाणेला खेळवता येऊ शकले... धोनीला या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं, असा सल्लाही शोएबनं देऊन टाकलाय. 

मॅचनंतर नाराज प्रेक्षकांनी मैदानावर बाटल्या फेकल्याबद्दलही शोएबनं नाराजी व्यक्ती केलीय. आपली नाराजी व्यक्त करण्याचा ही योग्य पद्धत नाही, असं त्यानं म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.