वॉशिंग्टन : अमेरिकेत क्रिकेटची लोकप्रियता वाढविण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि स्पिनचा जादूगर शेन वॉर्नसह अनेक महान क्रिकेटर नोव्हेंबर महिन्यात येथे टी-२० मॅच खेळणार आहेत.
तीन बिग ली बेसबॉल स्टेडिअम्सवर होणाऱ्या सामन्यात जगातील दोन डझनपेक्षा अधिक प्रसिद्ध खेळाडू या सामन्यात खेळणार आहे. वॉल स्ट्रिट जनरलने दिलेल्या बातमीनुसार मॅच सिटी फिल्ड, न्यू यॉर्कमध्ये (७ नोव्हेंबर) मिनट मेड पार्क, ह्युस्टन (११ नोव्हेंबर) आणि लॉस एंजिलीसच्या डोगेर स्टेडिअम (१४ नोव्हेंबर) ला होणार आहे.
वर्तमानपत्राशी बोलताना तेंडुलकर म्हणाला, आम्ही लोकांचे मनोरंजन करण्यासाठी तसेच त्यांचा चांगल्या आठवणी देण्यासाठी तेथील जनतेची क्रिकेटमध्ये रूची वाढविण्यासाठी जाणार आहोत. तेंडुलकर आणि वॉर्नसह पाकिस्तानचा वसीम अक्रम, वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा, दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस, इंग्लडचा मायकल वॉन आणि श्रीलंकेचा महेला जयवर्धने खेळणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.