नवी दिल्ली: महेंद्रसिंग धोनीच्या तडकाफडकी निवृत्तीचं ‘शास्त्री’ कारण समोर आलंय. धोनीनं अचानक निवृत्तीचा निर्णय घेतला कारण टीमच्या निर्णयात टीम डायरेक्टर रवी शास्त्री यांचा हस्तक्षेप अधिक वाढला होता.
त्यातच शास्त्री धोनीऐवजी विराटला कुठल्याही निर्णय घ्यायच्यवेळी अधिक पसंती द्यायचे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली अर्थातच अॅडलेड टेस्ट संपल्यानंतर विराट कोहलीला कॅप्टन करण्यासाठी शास्त्री अँड कंपनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती.
अॅडलेडमध्ये भारताची धुरा कोहलीनं सांभाळली होती. आणि भारत मॅच ही जिंकणार असं वाटत होतं. मात्र टीम इंडियाला ही मॅच गमवावी लागली होती. सुत्रांच्या माहितीनुसार ज्यावेळी रवी शास्त्रींना टीम डायरेक्टर केलं गेलं. तेव्हापासूनच भारतीय टीममधील वातावरण खराब झालं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.