...हा आहे 'डेथ कॉन्ट्रॅक्ट' स्वीकारणारा पहिला भारतीय!

'बीग बॉस सीझन 7'मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेला कुस्तीपटू संग्राम सिंह यानं 'डेथ कॉन्ट्रॅक्ट' साईन केलंय. यासोबतच रिअॅलिटी शो फेम संग्राम अशा पद्धतीचं 'डेथ कॉन्ट्रॅक्ट' स्वीकारणारा पहिला भारतीय बनलाय. 

Updated: Dec 30, 2014, 09:21 PM IST
 ...हा आहे 'डेथ कॉन्ट्रॅक्ट' स्वीकारणारा पहिला भारतीय! title=

मुंबई : 'बीग बॉस सीझन 7'मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेला कुस्तीपटू संग्राम सिंह यानं 'डेथ कॉन्ट्रॅक्ट' साईन केलंय. यासोबतच रिअॅलिटी शो फेम संग्राम अशा पद्धतीचं 'डेथ कॉन्ट्रॅक्ट' स्वीकारणारा पहिला भारतीय बनलाय. 

नुकतंच, संग्रामनं अभिनेत्री पायल रोहतगी हिच्यासोबत विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतलाय. या दोघांचा साखरपुडाही पार पडलाय. 

संग्रामनं 'लास्ट मॅन स्टॅंड फाईट'मध्ये हे कॉन्ट्रॅक्ट साईन केलंय. या करारानुसार, लढतीदरम्यान व्यक्ती मृत्यूमुखी पडल्यास किंवा जखमी झाल्यास त्यासाठी आयोजकांना जबाबदार धरता येत नाही. ही स्पर्धा लवकरच साऊथ आफ्रिकेत होणार आहे. विशेष म्हणजे, संग्रामनं दुसऱ्यांदा हा करार स्वीकारलाय. 

पायल आणि आपलं कुटुंब यासाठी आपल्याला कधीही परवानगी देणार नाही, असं संग्रामनं म्हटलंय. परंतु, त्यांनी नेहमीच लढतीसाठी मला पाठिंबा दिलाय, असंही तो म्हणतोय. 

महत्त्वाचं म्हणजे, या स्पर्धेदरम्यान भारीभक्कम बक्षिसं दिली जातात... यामध्ये, विजय मिळवून संग्राम आपल्याला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जातंय.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.