आजचा दिवस दुर्दैवी, सर्वोच्च न्यायलयाच्या निकालावर पवारांची नाराजी

बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरुन अनुराग ठाकूर यांना हटवण्यात आलंय. सुप्रीम कोर्टानं हा दणका दिलाय.

Updated: Jan 2, 2017, 05:10 PM IST
आजचा दिवस दुर्दैवी, सर्वोच्च न्यायलयाच्या निकालावर पवारांची नाराजी title=

मुंबई : बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरुन अनुराग ठाकूर यांना हटवण्यात आलंय. सुप्रीम कोर्टानं हा दणका दिलाय. तर बीसीसीआयच्या सचिवपदावरुन अजय शिर्के यांनाही हटवण्यात आलंय.  लोढा समितीच्या शिफारसी न पाळल्याचे परिणाम अनुराग ठाकूर यांना भोगावे लागलेत.

दरम्यान एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोढा समितीच्या शिफारसी आणि त्याच्या अंमलबजावणीविषयी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केलीय. 41 वेळा रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई क्रिकेटच्या इतिहासातला सर्वात दुर्दैवी दिवस असल्याचं पवारांनी म्हटलंय.

शरद पवार यांनी दिलेला मुंबई क्रिकेट असोशिएनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा आता स्वीकारला जाण्याची शक्यता आहे. पवारांनी दोन आठवड्यापूर्वीच अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, पण एमसीएच्या कार्यकारिणीनं तो स्वीकारलेला नाही. आज अनुराग ठाकूर यांच्या हकालपट्टीनंतर लोढा समितीच्या शिफारसींबाबत सुप्रीम कोर्ट अत्यंत गंभीर असल्याचं स्पष्ट झालं.