सर्वात जलद शतकाचा विक्रम पुन्हा करणार - आफ्रिदीचा

 १७ वर्षांपर्यंत वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक बनविण्याचा विक्रम आपल्या नावावर ठेवणाऱ्या पाकिस्तानचा धडकेबाज फलंदाज शाहिद आफ्रिदीला पुन्हा एकदा हा विक्रम आपल्या नावावर करायचा आहे. वर्ल्ड कप दरम्यान हा विक्रम मोडायचा असल्याचा मनोदय त्याने केला आहे. 

Updated: Jan 21, 2015, 05:45 PM IST
सर्वात जलद शतकाचा विक्रम पुन्हा करणार - आफ्रिदीचा title=

कराची :  १७ वर्षांपर्यंत वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक बनविण्याचा विक्रम आपल्या नावावर ठेवणाऱ्या पाकिस्तानचा धडकेबाज फलंदाज शाहिद आफ्रिदीला पुन्हा एकदा हा विक्रम आपल्या नावावर करायचा आहे. वर्ल्ड कप दरम्यान हा विक्रम मोडायचा असल्याचा मनोदय त्याने केला आहे. 

वर्ल्ड कपनंतर आफ्रिदी वन डे सामन्यातून निवृत्तीची घोषणा केली आहे. पण तो टी २० सामने खेळत राहणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी हा वर्ल्ड कप आठवणीतला त्याला करायचा आहे. 

एका मुलाखतीत त्याने सांगितले की, तुम्ही कधीही अशा प्रकारच्या विक्रमाची योजना बनवत नाही. असा विक्रम त्यावेळी होऊन जातो ज्यावेळी तुमचा दिवस विशेष असतो. त्यावेळी तुमचा आत्मविश्वास शिखरावर असतो. सर्व काही ठीक असते आणि तो दिवस माझ्यासाठी खास असेल तर एबी डिव्हिलिअर्सचा रेकॉर्ड मी न्यूझीलंड किंवा विश्व चषकादरम्यान तोडू इच्छितो. 

मला आनंद होतोय की वन डेमधील जलद अर्धशतक आणि शतक डिव्हिलिअर्सच्या नावावर आहे. 
आफ्रिदीने श्रीलंकेविरूद्ध ३७ चेंडूत १०२ धावा केल्या होत्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद बनविण्याचा विक्रम जवळपास १७ वर्षे टीकून राहिला होता. त्याचा हा रेकॉर्ड २०१३मध्ये न्यूझीलंडच्या कोरी एंडरसनने ३६ चेंडूंचा सामना करू तोडला. 

त्यानंतर गेल्या आठवड्यात वेस्ट इंडिज विरुद्ध ३१ चेंडूत शतक झळकावून डिविलिअर्सने नवी विक्रम बनविला आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.