शहिदांचा अपमान करणाऱ्याला सेहवागचं कडक उत्तर

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग त्याच्या हटके ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतो.

Updated: Feb 13, 2017, 09:40 PM IST
शहिदांचा अपमान करणाऱ्याला सेहवागचं कडक उत्तर  title=

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग त्याच्या हटके ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतो. नेहमी हलके फुलके ट्विट करणारा सेहवाग यावेळी मात्र भडकला आहे. शहिदांचा अपमान करणाऱ्या काश्मीरमधल्या एका व्यक्तीला सेहवागनं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. 

दक्षिण काश्मीरच्या कुलगाममध्ये रविवारी दहशतवादी हल्ल्यामध्ये भदौरिया गोपाल सिंग आणि रघुवीर सिंग हे दोन जवान शहीद झाले. या दोघांना सेहवागनं श्रद्धांजली दिली. यावेळी काश्मीरचा एक तरुण मोहम्मद उमेरनं सेहवागला टॅग करून शहीदांचा अपमान केला.

यावर भडकलेल्या सेहवागनंही कडक शब्दामध्ये मोहम्मद उमेरला उत्तर दिलं. तुझ्यासारख्या व्यक्तीसाठी शब्दकोशामध्येही काही शब्द नाहीत. गेट वेल सून असं ट्विट सेहवागनं केलं.