मुंबई : ब्रिटनचे पत्रकार पिअर्स मॉर्गन आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यामधल्या ट्विटर वॉरवर वीरेंद्र सेहवागनं पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. पिअर्स मॉर्गननी केलेल्या वक्तव्याबाबत अर्णब गोस्वामींनी मला त्यांच्या शोमध्ये बोलावलं होतं. पण पीअर्स मॉर्गनसाठी वेळ देण्याएवढी त्याची योग्यता नाही, म्हणून मी या शोमध्ये जायला नकार दिल्याचं ट्विट सेहवागनं केलं आहे.
Arnab Goswami wants me to speak on that British guys views on India on NewsHour,but that man doesnt deserve any airtime,hence I have denied
— Virender Sehwag (@virendersehwag) 2 September 2016
125 कोटी लोकसंख्या असलेला भारत हरल्यानंतरही मिळालेल्या दोन मेडल्सचं सेलिब्रेशन करत आहे. ही गोष्ट लाजीरवाणी नाही का असं ट्विट पिअर्स मॉर्गन यांनी केलं होतं.
छोट्या छोट्या गोष्टींचंही आम्ही सेलिब्रेशन करतो. ज्यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली त्यांना अजूनही वर्ल्ड कप जिंकता आला नाही, तरी ते वर्ल्ड कप खेळतायत, हे लाजीरवाणं नाही का असं सेहवाग म्हणाला होता.