दुसऱ्या वन-डेमध्ये टीम इंडियाला कमबॅकचं आव्हान

दुखापतग्रस्त मोहित शर्माऐवजी टीम इंडियामध्ये ईशांत शर्माला स्थान देण्यात आले आहे. पहिल्या वन-डेदरम्यान मोहितला दुखापत झाली आहे. आणि त्यामुळेच ईशांत शर्माला टीम इंडियात संधी देण्याचा निर्णय भारतीय सिलेक्शन कमिटीनं घेतला. 

Updated: Oct 11, 2014, 11:34 AM IST
दुसऱ्या वन-डेमध्ये टीम इंडियाला कमबॅकचं आव्हान title=

नवी दिल्ली : टीम इंडियासमोर आता दुसऱ्या वन-डेमध्ये कमबॅक करण्याचं आव्हान असेल दुखापतग्रस्त मोहित शर्माऐवजी टीम इंडियामध्ये ईशांत शर्माला स्थान देण्यात आले आहे. पहिल्या वन-डेदरम्यान मोहितला दुखापत झाली आहे. आणि त्यामुळेच ईशांत शर्माला टीम इंडियात संधी देण्याचा निर्णय भारतीय सिलेक्शन कमिटीनं घेतला. 

वेस्ट इंडिजनं कोची वन-डेमध्ये भारताचा 124 रन्सनं धुव्वा उडवला होता. आता टीम इंडियासमोर आता दुसऱ्या वन-डेमध्ये कमबॅक करण्याचं आव्हान असेल. सीरीजमध्ये बरोबरी साधण्यासाठी भारतीय टीमला आपल्या कामगिरीत आता कमालीची सुधारणा करावी लागेल. त्याचप्रमाणे कॅप्टनम धोनी कॅप्टन्सीचीही टेस्ट असेल.

दरम्यान, विराट कोहलीच्या खराब फॉर्मची चिंता साऱ्यांनाच सतावत आहे. काही केल्या विराटला फॉर्म गवसलेला नाही. त्यामुळेच कोहलीनं आपल्या बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल करावा असा सल्ला भारताचे माजी कॅप्टन सुनील गावसकर यांनी दिलाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.