मोहितला डच्चू; इशांतला संधी!

Updated: Oct 10, 2014, 07:09 PM IST
मोहितला डच्चू; इशांतला संधी! title=

 

मुंबई : वेस्ट इंडिजसोबत असलेल्या पाच दिवसीय वनडे सीरिजच्या पहिल्या मॅचमध्ये भारतीय टीमचा गोलंदाज मोहित शर्मा याला डच्चू मिळालाय. त्याच्याऐवजी आता दिल्लीचा गोलंदाज इशांत शर्मा याला संधी मिळालीय.

 
मोहित हा वनडे सिरीजमधून बाहेर झाला आहे. मोहित दुखापतीमुळे 'मायक्रोमॅक्स कप'मध्ये खेळणार नसल्याचं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भारतीय निवड समितीने मोहितच्या जागी इशांतला टीममध्ये घेतले आहे.

इशांत शेवटची वनडे मॅच न्यूझिलंडविरुद्ध खेळालाय. त्यानंतर बांग्लादेशसोबत झालेल्या आशियाई कप आणि इंग्लंडमधील वनडे सीरिजमध्ये खेळायचीही संधी त्याला मिळाली नव्हती.

 
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सीरिजमध्ये सध्या भारत 0-1 मागे असल्याचे दिसून येते. कोच्चीमध्ये झालेल्या पहिल्या मॅचमध्ये 124 रन्सने परभव स्वीकारावा लागला. तर दुसरी मॅच दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानात होणार आहे. या मॅचसाठी इंडीया टीम दिल्लीला पोहचलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.