सिडनी : प्रथमश्रेणी क्रिकेटमधून ब्रॅड हॅडिनने निवृत्ती जाहीर केलेय. याआधी शेन वॉट्सनने निवृत्ती घेतली.
ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक-फलंदाज ब्रॅड हॅडिन याने प्रथमश्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला गळती लागल्याचे म्हटले जात आहे. याआधी अष्टपैलू खेळाडू शेन वॉट्सन याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता.
हॅडिनने २००८मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध त्याने पदार्पण केले. २०१३मध्ये मायदेशातील ऍशेस मालिकेसाठी त्याला उपकर्णधार करण्यात आले. त्याने आठपैकी सहा डावांत अर्धशतक आणि २२ झेल अशी कामगिरी केली. हॅडिन स्थानिक टी-२० क्रिकेट खेळणार आहे.
दरम्यान, श्रीलंकेच्या क्रिकेट संघाचे प्रशिक्षक मर्वान अट्टापटू यांनी आपल्या पदाचा गुरुवारी तडकाफडकी राजीनामा दिला. हा राजीनामा श्रीलंका क्रिकेट मंडळाने स्वीकारला. क्रिकेट मंडळ वा अट्टापटू या दोघांनीही राजीनामा देण्यामागचे कारण स्पष्ट केलेले नाही. गेल्या वर्षी सप्टेंबरपासूनच अट्टापट्टू यांची संघाच्या प्रशिक्षकपदी अधिकृतरित्या नियुक्ती झाली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.