सानिया बनली तेलंगणाची ब्रँड अॅम्बेसेडर!

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा हिला स्वतंत्र तेलंगणा राज्याची ब्रांड अॅम्बेसेडर म्हणून घोषित करण्यात आलंय. 

Updated: Jul 23, 2014, 12:06 PM IST
सानिया बनली तेलंगणाची ब्रँड अॅम्बेसेडर! title=

हैदराबाद : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा हिला स्वतंत्र तेलंगणा राज्याची ब्रांड अॅम्बेसेडर म्हणून घोषित करण्यात आलंय. 

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी उद्योगपतींबरोबर चर्चा केल्यानंतर सानियाला नियुक्ती पत्र आणि एक करोड रुपयांचा चेक प्रदान केला.

‘तेलंगणाला सानियावर गर्व आहे’ असं यावेळी चंद्रशेखर राय यांनी म्हटलंय. सानिया मूळची हैदराबादची आहे. ‘आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये ती पाचव्या नंबरवर आहे... ती नंबर वन होण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो’ असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलंय.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.