राजस्थान रॉयलचा रिचर्ड्सन IPL मधून बाहेर

राजस्थान रॉयलमध्ये खेळणारा ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर केन रिचर्ड्सन वैयक्तिक कारणांमुळे आयपीएल-८मधून बाहेर पडला आहे. 

Updated: Apr 4, 2015, 01:04 PM IST
राजस्थान रॉयलचा रिचर्ड्सन IPL मधून बाहेर title=

मुंबई : राजस्थान रॉयलमध्ये खेळणारा ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर केन रिचर्ड्सन वैयक्तिक कारणांमुळे आयपीएल-८मधून बाहेर पडला आहे. 

रिचर्ड्सननं शुक्रवारी हा निर्णय घेतला आहे. शेन वॉटसन, स्टिव्हन स्मिथ, जेम्स फॉकनर आणि बेन कटिंगसोबत त्याला भारतात पोहचायचं होतं. मात्र याआधीच त्यानं आयपीएल न खेळण्याची घोषणा केली. 

रिचर्ड्सननं ट्विट करुन माहिती दिली की, "मी काही वैयक्तिक कारणांमुळे आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही. राजस्थान रॉयल टीमने केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद."

रिचर्ड्सननं ऑस्ट्रेलियाकडून आठ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यानं ११ विकेटही घेतल्या आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.