'युवी' टाकतोय 'विराट'च्या पाऊलावर पाऊल

बॉलिवूड आणि क्रिकेटर याचं नात किती घट्ट आहे, हे सर्वानाच ठाऊक आहे. सध्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची जोडी खुपच चर्चेत आहे. त्यातच भारतीय टीमच्या सिक्सर किंगलाही बॉलिवुड अॅक्ट्रेसशी प्रेम झाल्याची बातमी आहे.

Updated: Mar 22, 2015, 04:25 PM IST

मुंबई : बॉलिवूड आणि क्रिकेटर याचं नात किती घट्ट आहे, हे सर्वानाच ठाऊक आहे. सध्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची जोडी खुपच चर्चेत आहे. त्यातच भारतीय टीमच्या सिक्सर किंगलाही बॉलिवुड अॅक्ट्रेसशी प्रेम झाल्याची बातमी आहे.

ज्या अॅक्ट्रेसच्या प्रेमात युवी पडलाय तिचं नाव आहे 'आसिन'. माहितीनुसार काही दिवसांपासून दोघांमध्ये बरीच जवळीक निर्माण झाली आहे. बऱ्याच ठिकाणी हे दोघे एकत्र दिसले आहेत.

इंस्टाग्रामवर दोघाचं चांगलच बॉंडिंग झाल्याचं दिसूण येत आहे. काही दिवसांपूर्वी आसिनने इंस्टाग्रामवर तिचे फोटो शेअर केले होते त्यावर युवराजने अनेक कमेंट दिल्या होत्या. दोघे इंस्टाग्रामवर चॅंटिगही करत असून आसिनला युवीने नविन नाव दिल्याचीही चर्चा आहे.
 
आसिन सध्या अभिषेक बच्चन बरोबरच्या एका सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. आसिनने युवीबरोबरच्या नात्याबद्दल कोणतही वक्तव्य केलेलं नाही. मात्र, दोघामध्ये फक्त मैत्री असल्याची माहिती असिनच्या प्रवक्त्यानी दिली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.