सचिन तेंडुलकर मैदानात अर्जुन तेंडुलकरची शतकी खेळी!

 'क्रिकेटचा देव' मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या मुलानं अर्जुननं आपल्याच वडिलांच्या नावावर असलेल्या मैदानात आपलं कर्तृत्व दाखवून दिलंय. 

Updated: Nov 25, 2015, 03:44 PM IST
सचिन तेंडुलकर मैदानात अर्जुन तेंडुलकरची शतकी खेळी! title=

नवी दिल्ली : 'क्रिकेटचा देव' मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या मुलानं अर्जुननं आपल्याच वडिलांच्या नावावर असलेल्या मैदानात आपलं कर्तृत्व दाखवून दिलंय. 

अर्जुन तेंडुलकरनं शानदार बॅटींग करत १०६ रन्सची दमदार खेळी खेळलीय.  अंडर १६ मॅचमध्ये 'सुनिल गावसकर इलेव्हन' आणि 'रोहित शर्मा इलेव्हन' या दोन टीम्समध्ये ही मॅच खेळली गेली.  

विशेष म्हणजे, सचिन तेंडुलकर जिमखाना स्टेडियममध्ये ही मॅच खेळली गेली. अर्जुनच्या शतकी खेळीसहीत 'गावस्कर इलेव्हन' या टीमनं २१८ रन्सचा स्कोअर उभा केला. 

यापूर्वी, सप्टेंबर महिन्यात ४२ बॉल्समध्ये ११८ रन्सची दमादर खेळी खेळणारा अर्जुन चर्चेत आला होता... सचिन तेंडुलकरचा मुलगा असल्यानं त्याच्याकडून अनेक अपेक्षाही व्यक्त केल्या जात आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.