९९ धावांवर बाद होणारा रोहित ठरला सहावा भारतीय फलंदाज

सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या वनडे सामन्यात रोहित शर्माने शानदार ९९ धावांची खेळी केली. 

Updated: Jan 23, 2016, 04:33 PM IST
९९ धावांवर बाद होणारा रोहित ठरला सहावा भारतीय फलंदाज title=

सिडनी : सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या वनडे सामन्यात रोहित शर्माने शानदार ९९ धावांची खेळी केली. अवघ्या एका धावेने त्याचे शतक हुकले. ९९ धावांवर बाद  होणारा रोहित ठरला सहावा भारतीय फलंदाज ठरलाय.

९९वर सर्वाधिक वेळा बाद होण्याचा विक्रम भारताच्या सचिन तेंडुलकरच्या नावार आहे. सचिन ९९वर तीन वेळा बाद झाला. तर के. श्रीकांत, विराट कोहली, राहुल द्रविड, व्ही. व्ही. एस लक्ष्मण हे एकदा बाद झालेत. त्यानंतर रोहितचा नंबर आहे. 

सचिन इंग्लंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात तर कोहली आणि लक्ष्मण वेस्ट इंडिजविरुद्ध, श्रीकांत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात तर द्रविड पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ९९वर बाद झाला होता.