पुण्याविरुद्ध मुंबईचा पुन्हा पराभव

आयपीएलमधील पुण्याविरुद्धच्या सामन्यात मुंबंईचा पुन्हा एकदा पराभव झाला. मुंबईचा पुण्याविरुद्धचा हा यंदाच्या आयपीएलमधील तिसरा पराभव आहे. पुण्याने मुंबईला २० धावांनी हरवले. 

Updated: May 16, 2017, 11:47 PM IST
पुण्याविरुद्ध मुंबईचा पुन्हा पराभव title=

मुंबई : आयपीएलमधील पुण्याविरुद्धच्या सामन्यात मुंबंईचा पुन्हा एकदा पराभव झाला. मुंबईचा पुण्याविरुद्धचा हा यंदाच्या आयपीएलमधील तिसरा पराभव आहे. पुण्याने मुंबईला २० धावांनी हरवले. 

पुण्याने मुंबईसमोर विजयासाठी १६३ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र मुंबईला संपूर्ण डाव अवघ्या १४२ धावांवर संपुष्टात आला. मुंबईच्या पार्थिव पटेलने केलेली अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली. 

पुण्याकडून खेळताना अजिंक्य रहाणेने ५६ तर मनीष तिवारीने ५८ धावांची खेळी केली. महेंद्रसिंग धोनीने नाबाद ४० धावा ठोकल्या. मुंबईकडून मात्र एकमेव पार्थिव पटेलला ५२ धावांनी सर्वाधिक धावा करता आल्या.