इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20मध्ये झाली ही 5 रेकॉर्ड

 इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20मध्ये भारतानं 75 रननी विजय मिळवत सीरिजही 2-1नं खिशात टाकली.

Updated: Feb 2, 2017, 12:27 PM IST
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20मध्ये झाली ही 5 रेकॉर्ड title=

बंगळुरू : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20मध्ये भारतानं 75 रननी विजय मिळवत सीरिजही 2-1नं खिशात टाकली. भारतानं ही मॅच अगदी सहज जिंकली असली तरी रेकॉर्डचा या मॅचमध्ये पाऊस पडला आहे.

- 76 आंतरराष्ट्रीय टी20 खेळल्यावर धोनीनं पहिली हाफ सेंच्युरी झळकावली आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 मॅच खेळल्यानंतर हाफ सेंच्युरी झळकवण्याचा रेकॉर्ड आता धोनीच्या नावावर झाला आहे. याआधी आयर्लंडच्या गॅरी विल्सननं 42 मॅचनंतर हाफ सेंच्युरी झळकावली होती.

- याआधी 2010साली रैनानं आंतरराष्ट्रीय टी20मध्ये हाफ सेंच्युरी झळकावली होती. 38 इनिंगनंतर रैनाला हाफ सेंच्युरी मारता आली आहे.

- पॉवर प्लेमध्ये तीनपेक्षा अधिक सिक्स मारणाऱ्या भारतीयांच्या यादीत आता रैना तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. याआधी सेहवागनं 2009साली न्यूझीलंडविरुद्ध चार सिक्स आणि 2016साली रोहित शर्मानं वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सिक्स मारल्या होत्या.

- आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये भारताकडून खेळणारा रिषभ पंत हा सर्वात लहान खेळाडू ठरला आहे. 19 वर्ष आणि 120 दिवसांचा पंत काल त्याची पहिली टी20 खेळला. याआधी इशांत शर्मानं 19 वर्ष आणि 152 दिवसांचा असताना पहिली टी20 खेळला होता.

- इंग्लंडनं शेवटच्या आठ विकेट या फक्त आठ रनवर गमावल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला हा दुसरा वाईट रेकॉर्ड आहे. 1946मध्ये न्यूझीलंडनं पाच रनवर आठ विकेट गमावल्या होत्या.