क्रिकेटरच्याच होणाऱ्या पत्नीला क्रिकेट आवडत नाही

टीम इंडियाचा ऑल राउंडर रविंद्र जडेजा याचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला.

Updated: Feb 12, 2016, 03:59 PM IST
क्रिकेटरच्याच होणाऱ्या पत्नीला क्रिकेट आवडत नाही title=

नवी दिल्ली : टीम इंडियाचा ऑल राउंडर रविंद्र जडेजा याचा काही दिवसांपूर्वीच रिवा सोलंकी हिच्या सोबत साखरपुडा झाला. पण तुम्हाला हे एकूण आर्श्चय वाटेल की एका क्रिकेटरची होणारी पत्नी क्रिकेटबद्दल काय विचार करते.

रविंद्र जडेजा याची होणारी पत्नी रिवा सोलंकीला क्रिकेट म्हणजे वेळ वाया घालवणे असं वाटतं. रिवा आता सध्या सिव्हिल सर्विसेसचा अभ्यास करतेय. परीक्षा झाल्यानंतर ती मॅचसाठी वेळ देईल असं तिचं म्हणणं आहे. जडेजा सोबत संबंध जुळल्यानंतर तिचा क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल असं देखील ती म्हणतेय.

रिवा आता म्हणतेय की तिने क्रिकेट समजणं सुरू केलं आहे. ज्या मॅचमध्ये जडेजा खेळेल ती मॅच ती बघायला देखील जाईल असं देखील तिने म्हटलं आहे.