अव्वल स्थान वाचवण्यासाठी टीम इंडिया मैदानात

श्रीलंकेच्या अनुभव नसलेल्या टीमनं पुण्यातली टी-20 जिंकत भारताला पराभवाचा जोरदार धक्का दिला.

Updated: Feb 12, 2016, 03:33 PM IST
अव्वल स्थान वाचवण्यासाठी टीम इंडिया मैदानात title=

रांची: श्रीलंकेच्या अनुभव नसलेल्या टीमनं पुण्यातली टी-20 जिंकत भारताला पराभवाचा जोरदार धक्का दिला. यानंतर आता आज होणाऱ्या दुसऱ्या टी-20 मध्ये भारतीय संघ उतरेल तो सीरिज वाचवण्यासाठी. 

पण याबरोबरच आणखी एक आव्हान भारतासमोर उभं ठाकलं आहे. ते म्हणजे टी-20 रॅकिंगमध्ये नंबर एकवर कायम राहण्याचं. ही मॅच हरली तर धोनी ब्रिगेडचं नंबर वन रॅकिंग धोक्यात येणार आहे.

 

पुण्यातली पहिली टी-20 हरल्यानंतर धोनीनं पीचला दोष दिला होता. हे पीच म्हणजे इंग्लिश खेळपट्टी असल्याचं धोनी म्हणाला होता. त्यामुळे रांचीमध्ये होणाऱ्या या दुसऱ्या टी-20 मध्ये भारतीय संघाला हवी तशी बॅट्समनना अनुकूल खेळपट्टी मिळणार हे निश्चित झालं आहे. 

रांचीमधल्या या मैदानावर भारताचा रेकॉर्ड शानदार आहे. भारतानं या मैदानावर 3 वनडे खेळल्या आहेत, यातल्या तीनही वनडेमध्ये भारताचाच विजय झाला आहे, तर या सगळ्या मॅचमध्ये 300 च्या जवळपास स्कोर झाला आहे, त्यामुळे या मॅचमध्येही रनचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.