वर्ल्डकपचा फॉर्मेट योग्य नाही, त्यात बदल हवा - द्रविड

'द वॉल' राहुल द्रविडनं ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपचं स्वरूप बदलण्याची गरज असल्याचं म्हटलंय.  

Updated: Jan 21, 2015, 02:11 PM IST
वर्ल्डकपचा फॉर्मेट योग्य नाही, त्यात बदल हवा - द्रविड title=

नवी दिल्ली: 'द वॉल' राहुल द्रविडनं ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपचं स्वरूप बदलण्याची गरज असल्याचं म्हटलंय.  

द्रविड म्हणतो, 'मला प्रत्यक्षात हे आवडत नाही. कारण आपण अंदाज लावू शकतो की, टॉप ८ टीम कोणत्या असतील. गेल्या वर्षी भारतात खेळल्या गेलेल्या वर्ल्डकपमध्ये मी मॅच खेळत नव्हतो. मी फक्त पाहत होतो. सर्व क्वार्टर फायनलची वाट पाहत होते. कारण सर्वांनाच कळत होतं या मॅच मोठ्या असतील.'

राहुल द्रविड इएसपीएन क्रिक इन्फोच्या एका कार्यक्रमात म्हणाला, 'माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ १९९९ आणि २००३चा वर्ल्डकप होता. ज्यात मी खेळलो होतो. तिथं ग्रुप पद्धत होती. मग सुपर सिक्स आणि त्यानंतर सेमीफायनल आणि फायनल. आपल्याला पूर्ण टूर्नामेंटमध्ये चांगलं खेळायला हवं. यात आपल्याला परतण्यासाठी थोडा वेळ मिळतो.'

द्रविडने सांगितलं, 'मला २००७ची पद्धत अजिबात आवडली नव्हती. अव्वल आठ टीम्स एकमेकांसोबत भिडण्याची इच्छा होती. पण आपली सुरूवात खराब झाली तर पुन्हा तशी संधी मिळत नाही.' द्रविडला वाटतं टीमनं सर्वश्रेष्ठ बॅट्समनना सुरूवातीला मैदानात उतरवलं पाहिजे. 

द्रविड म्हणतो, निश्चितपणे जो सुरूवातीला आऊट होणार नाही. पण तरीही आक्रमक बॅट्समन असेल. आपल्याला असे बॅट्समन पाहिजे जे फास्ट बॉलरसमोरही तगडं आव्हान ठेवेल. येत्या वर्ल्डकपमध्ये स्पिनर्सची भूमिका महत्त्वाची असेल. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.