पी. व्ही. सिंधूची विजयी आगेकूच कायम

भारताचे इतर खेळाडू पात्रता फेरीतच गारद होत असताना भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने बॅडमिंटनच्या महिला एकेरीत क्वार्टरफायनलमध्ये धडक मारलीये. तिने प्री क्वार्टरफायनलमध्ये चीन तैपेईच्या ताई झू यिंगचा सरळ गेममध्ये पराभव केला. 

Updated: Aug 16, 2016, 08:33 AM IST
पी. व्ही. सिंधूची विजयी आगेकूच कायम title=

रिओ : भारताचे इतर खेळाडू पात्रता फेरीतच गारद होत असताना भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने बॅडमिंटनच्या महिला एकेरीत क्वार्टरफायनलमध्ये धडक मारलीये. तिने प्री क्वार्टरफायनलमध्ये चीन तैपेईच्या ताई झू यिंगचा सरळ गेममध्ये पराभव केला. 

चीन तैपेईच्या खेळाडूविरुद्ध सिंधूने 21-13, 21-15 असे सरळ दोन गेम अवघ्या 40 मिनिटांत जिंकले. सिंधूची पुढची लढत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या चीनच्या वँग यिहानशी होणार आहे. 

सिंधूची विजयी आगेकूच कायम असली तर बॉक्सिंगमधील भारताचे आव्हान संपुष्टात आले. भारताचा विकास कृष्णनला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.