वादानंतर पुण्यानं डिलीट केलं ते आक्षेपार्ह ट्विट

आयपीएलच्या दहाव्या मोसमाच्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सनं पुण्याचा रोमहर्षक मॅचमध्ये एक रननं पराभव केला.

Updated: May 22, 2017, 06:28 PM IST
वादानंतर पुण्यानं डिलीट केलं ते आक्षेपार्ह ट्विट  title=

हैदराबाद : आयपीएलच्या दहाव्या मोसमाच्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सनं पुण्याचा रोमहर्षक मॅचमध्ये एक रननं पराभव केला. यंदाच्या मोसमात पुण्यानं फायनलआधी झालेल्या तिन्ही मॅचमध्ये मुंबईचा पराभव केला होता. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या मुंबईची अवस्था १५ ओव्हरमध्ये ७ बाद ७९ अशी झाली होती. त्यामुळे यावेळीही मुंबईचा पराभव होणार असंच बोललं जात होतं.

मुंबईची अवस्था ४१ रन्सवर ३ विकेट अशी असताना पुण्याच्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊंटवरून मुंबईला ट्रोल करण्यात आलं. या ट्विटमध्ये मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माचा रडतानाचा मॉर्फ केलेला फोटो ट्विट करण्यात आला. या फोटोमुळे झालेल्या वादानंतर अखेर ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो डिलीट करण्यात आला.