जालंधर: हरभजन सिंहच्या लग्नाला काही तास उलटले असतांनाच भज्जीचं लग्न वादात सापडलंय. शिख संघनांनी दावा केलाय की, भज्जीच्या लग्नात ११३ प्रकारचे तंबाखू वाटले गेलेत. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय.एवढंच नव्हे तर याविरोधात संघटना अकाल तख्तकडेही जाणार आहेत.
आणखी वाचा - भज्जीच्या लग्नात झाला राडा
म्हणाले धार्मिक भावना दुखावल्या गेल्या
शिख संघटनांनी सांगितलं की, भज्जी स्वत: शिख संघटनेत आहे. त्याला माहितीय शिख धर्मात हुक्का-तंबाखूचं सेवन ते वाढण्यावरही बंदी आहे. असं असतांनाही भज्जीच्या पाहूण्यांना तंबाखू आणि हुक्क्याचं सेवन करवलं.
यामुळं आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. संघटनांनी भज्जीविरुद्ध कारवाईची मागणी केलीय. भज्जीचं २९ ऑक्टोबरला बॉलिवूड अभिनेत्री गीता बासरासोबत लग्न केलं.
आणखी वाचा - रंगला हरभजन-गीताचा मेहंदी सोहळा, फोटो वायरल
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.