दुसऱ्या टी-२०मध्ये विजय मिळवून देणाऱ्या जसप्रीतची अशी आहे पर्सनल लाईफ

सलामीवीर फलंदाज लोकेश राहुलचे दमदार अर्धशतक आणि त्यानंतर वेगवान गोलंदाज आशिष नेहरा आणि जसप्रीत बुमराह यांच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडवर ५ धावांनी विजय मिळवला. 

Updated: Jan 31, 2017, 10:46 AM IST
दुसऱ्या टी-२०मध्ये विजय मिळवून देणाऱ्या जसप्रीतची अशी आहे पर्सनल लाईफ title=

नागपूर : सलामीवीर फलंदाज लोकेश राहुलचे दमदार अर्धशतक आणि त्यानंतर वेगवान गोलंदाज आशिष नेहरा आणि जसप्रीत बुमराह यांच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडवर ५ धावांनी विजय मिळवला. 

या विजयासह भारताने या मालिकेत आपले आव्हान कायम ठेवलेय. तीन सामन्यांच्या मालिकेत भारत १-१ अशा बरोबरीत आहे. या विजयात चमकला तो जसप्रीत बुमराह

जाणून घ्या जसप्रीतच्या पर्सनल लाईफबद्दल

बुमराहचा जन्म ६ डिसेंबर १९९३मध्ये अहमदाबादमध्ये एका पंजाबी कुटुंबात झाला. जसप्रीत व्यतिरिक्त घरात त्याची मोठी बहीण आहे. जसप्रीत ७ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचे संगोपन त्याच्या आईने केले.

बुमरहाची फेव्हरिट डिश आहे गुजराती ढोकळा. जसप्रीतचा त्याचे इतर क्रिकेटर्स मित्र जेबी या नावाने हाक मारतात. बुमराहचा शांत स्वभाव हीच त्याची खरी ताकद आहे असे त्याचे मित्र तसेच घरच्यांचे म्हणणे आहे.