कांगारूंना कमी लेखू नका- सचिन तेंडुलकर

ऑस्ट्रेलियाची टीम फेब्रुवारी महिन्यामध्ये भारताच्या दौऱ्यावर येणार आहे.

Updated: Jan 30, 2017, 07:32 PM IST
कांगारूंना कमी लेखू नका- सचिन तेंडुलकर title=

मुंबई : ऑस्ट्रेलियाची टीम फेब्रुवारी महिन्यामध्ये भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं भारतीय टीमला मोलाचा सल्ला दिला आहे.

परदेशी टीम्सना भारतीय वातावरणात खेळणं आव्हानात्मक असलं तरी ऑस्ट्रेलियाला कमी लेखून चालणार नसल्याचं मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं म्हटलंय. याआधी 2004साली ऑस्ट्रेलियानं भारताला भारतात टेस्ट सीरिजमध्ये हरवलं होतं.