ऑलिंपिक २०२४ होणार भारतात?

२०२४मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक खेळाचं आयोजन भारतात व्हावं यासाठी भारताने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांना भेटण्याची शक्यता आहे. या महीन्याच्या शेवटच्या आठवड्यात थॉमस बाक भारतात येणार आहेत. त्यावेळी या  भेटीची अपेक्षा आहे.

Updated: Apr 3, 2015, 06:09 PM IST
ऑलिंपिक २०२४ होणार भारतात? title=

नवी दिल्ली : २०२४मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक खेळाचं आयोजन भारतात व्हावं यासाठी भारताने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांना भेटण्याची शक्यता आहे. या महीन्याच्या शेवटच्या आठवड्यात थॉमस बाक भारतात येणार आहेत. त्यावेळी या  भेटीची अपेक्षा आहे.

१२५ कोटी लोकांच्या देशाला आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. भारत या खेळाचं यजमानपद योग्य रित्या पार पाडण्यासाठी सक्षम आहे, असे थॉमस बाक यांनी सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार बाक यांच्या भारत दौऱ्यात पंतप्रधान बाक यांच्या सोबत या विषयावर चर्चा करू शकतात. तसेच ऑलिंपिकच्या आयोजनासाठी गुजरात शहराच्या नावाचा प्रस्ताव ठेवला जाण्याची शक्यता आहे.

यापूर्वी २०१०मध्ये भारतात कॉमनवेल्थ खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं. २०२४च्या ऑलिंपिक खेळांसाठी इटलीने रोम आणि जर्मनीने हॅम्बर्ग शहरांच्या नावाने यजमानपदासाठी प्रस्ताव सादर केला आहे. २०१६चं ऑलिंपिक ब्राझीलच्या रियो डि जेनेरियोमध्ये आणि २०२०चं ऑलिंपिक जपानच्या टोकियो शहरात होणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.