न्यूझीलंडच्या मिशेल मॅक्लेनघनला सामन्यादरम्यान दुखापत

टी-२० मालिकेत २-० ने विजय मिळवल्यानंतर तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतही न्यूझीलंडच्या क्रिकेट टीमने विजयरथ कायम ठेवलाय. न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडेत ७० धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. बातमीच्या खाली पाहा व्हिडीओ

Updated: Jan 25, 2016, 02:12 PM IST
न्यूझीलंडच्या मिशेल मॅक्लेनघनला सामन्यादरम्यान दुखापत title=

वेलिंग्टन : टी-२० मालिकेत २-० ने विजय मिळवल्यानंतर तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतही न्यूझीलंडच्या क्रिकेट टीमने विजयरथ कायम ठेवलाय. न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडेत ७० धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. बातमीच्या खाली पाहा व्हिडीओ

मात्र या सामन्यादरम्यान न्यूझीलंडचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू मिशेल मॅक्लेनघनला दुखापत झाली. ५०व्या षटकांत मॅक्लेनघन १८ चेंडूवर खेळत होता. तेव्हा अन्वर अलीने टाकलेला बाउंसर सरळ त्याच्या हेल्मेटमधून घुसून डोळ्यावर बसला. 

बॉलचा फटका इतका जबरदस्त होता की मिशेल जमिनीवर कोसळला आणि त्याच्या डोळ्यातून रक्त वाहू लागले. त्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. 

पाहा व्हिडीओ