क्रिकेटर विराट कोहलीची नवी इनिंग...

विराट कोहलीची नवी इनिंग क्रिकेट चाहत्यांना पहायला मिळणार आहे.

Updated: Jun 7, 2016, 10:52 AM IST
क्रिकेटर विराट कोहलीची नवी इनिंग... title=

मुंबई : विराट कोहलीची नवी इनिंग क्रिकेट चाहत्यांना पहायला मिळणार आहे.

ए आर रेहमान यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं आता विराट गाणार आहे. फुटबॉलच्या प्रिमियर फुसलचं थीम साँग कोहली गाणार आहे.

क्रिकेटच्या मैदानापेक्षा गाणं गाण्यासाठी अधिक दबाव असल्याचंही त्यानं प्रांजळपणे कबूल केलंय. 'क्रिकेट खेळण्यासाठी मी तयारी करू शकतो. मात्र, गाण गाण्यासाठी काय तयारी करावी लागते याची मला काहीच कल्पना नसल्याचंही' कोहलीनं म्हटलंय. 

येत्या दोन आठवड्यात कोहलीनं रेकॉर्ड केलेलं हे गाणं त्याच्या चाहत्यांना ऐकायला मिळणार आहे. जुलैपासून प्रमियर फुसलला सुरुवात होणार आहे.