लंडन: गतविजेता इंग्लंडचा अव्वल टेनिस प्लेअर अँडी मरेचं विम्बल्डनमधील आव्हान संपुष्टात आलंय. क्वार्टर फायनलमध्ये बेल्जियमच्या अकराव्या सीडेड रिगॉर दिमित्रोवनं 6-1, 7-6, 6-2नं अँडी मरेला पराभवाची धुळ चारली.
राफेल नदाल, मारिया शारापोव्हा आणि सेरेना विलियम्सनंतर विम्बल्डनमध्ये हा चौथा अपसेट ठरलाय. अँडी मरेनं गेल्यावर्षी विम्बल्डनला गवसणी घालत 1936नंतर प्रथमच विजेतेपद पटकावून दिलं होतं. यामुळं यावर्षी त्याच्याकडून इंग्लंडला विजेतेपदाच्या आशा होत्या.
तर माजी वर्ल्ड नंबर वन रॉजर फेडरर आणि नोव्होक जोकोविच या दोघांनीही विम्बल्डनच्या सेमी फायनलमध्ये धडक मारलीय. फेडररनं क्वार्टर फायनलमध्ये आपल्याच देशाच्या स्टॅन वावरिंकाला पराभूत केलं. फेडररनं 3-6, 7-6, 6-4, 6-4नं विजय मिळवत विम्बल्डनच्या सेमी फायनलमध्ये नव्यांदा प्रवेश केलाय.
तर सर्बियाच्या नोव्होक जोकोविचनं क्रोएशियाच्या मरिन किलिकला पराभूत करत सेमी फायनल गाठली. जोकोविचनं मरिनवर 6-1, 3-6, 6-7, 6-2, 6-2नं विजय मिळवला. जोकोविचनं सलग पाचव्यांदा विम्बल्डनच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.