मुंबई : सलामीवीर मुरली विजयच्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी इंग्लंडला चोख प्रत्युत्तर दिलेय.
भारताने पहिल्या डावात दोनशे धावांचा टप्पा पार केलाय. ते अद्याप 180हून अधिक धावांनी पिछाडीवर असून त्यांचे आठ गडी शिल्लक आहेत. राजकोट कसोटीनंतर मोठी खेळी करु न शकलेल्या मुरली विजयने तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात शानदार शतक झळकावले.
त्याने 231 चेंडूत ही शतकी खेळी साकारली. दुसऱ्या दिवशी लोकेश राहुल स्वस्तात बाद झाल्यानंतर मुरली आणि चेतेश्वर यांनी खेळपट्टीवर स्थिरावत 146 धावांपर्यंत मजल मारली होती.
तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला इंग्लंडला चेतेश्वरचा बळी मिळवण्यात यश मिळाले. चेतेश्वर 47 धावा करुन बाद झाला. मात्र दुसरीकडे मुरली खेळपट्टीवर स्थिरावला होता. त्याने पुजारा बाद झाल्यनंतर त्याने विराटच्या सहाय्याने धावगती वाढवली.